“प्रिय लक्ष्मी रोड…”,’मिसेस मुख्यमंत्री’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुंबई | Tejas Barve’s Post In Discussion – सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून निर्बंधमुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा थाटामाटात सर्व सण साजरे होणार आहेत. तसंच आता सर्वांनाच गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. निर्बंधमुक्तीमुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता तेजस बर्वेनं गणेशोत्सवानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
तेजस बर्वे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. सध्या तो ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. त्याने नुकतंच आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. तेजसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने ढोल-ताशा वाजवतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने एक खास पोस्टही शेअर केली आहे.
“प्रिय लक्ष्मी रोड… गेली 2 वर्ष तू आम्हाला आणि तितकंच आम्ही तुला मिस केलंय रे…चल.. या वर्षीपासून तेच आपलं पूर्वीचं नातं पुन्हा जगू…बाप्पा पुन्हा येतोय आपल्यासोबत तोच समाधान चौकातला गजर, पावसात ओली झालेली आणि पाय रंगवून टाकणारी रांगोळी, शगुन चौकातला खेळ, अलका चौकातला शेवटचा गजर पहायला…पुन्हा ‘तोच’ लक्ष्मी रोड पहायला…. बाप्पा ह्या वर्षी वाजत गाजत या..”, असं तेजस बर्वेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच त्याची ही पोस्ट चर्चेत असून त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.