तेजस ठाकरेंनी शोधला नव्या प्रजातीचा साप, सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात सापडला म्हणून दिलं ‘हे’ नाव
मुंबई | Tejas Thackeray – माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी नव्या प्रजातीचा साप शोधला आहे. तेजस ठाकरे यांनी त्यांच्या टीमसह सह्याद्रीच्या (Sahyadri) कडाकपाऱ्याक एका नव्या प्रजातीचा साप शोधला आहे. तसंच त्यांनी या सापाला एक खास असं नाव देखील दिलं आहे. सध्या या सापाच्या नावाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात नव्या प्रजातीचा साप सापडल्यानं तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं या सापाला ‘सह्याद्रीओफिस’ (Sahyadriofis) असं नाव दिलं आहे. तेजस ठाकरे आणि वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्शिल पटेल यांना पश्चिम घाटात हा नव्या प्रजातीचा साप आढळून आला.
नवीन प्रजातीच्या सापाला कशावरून दिलं ‘सह्याद्रीओफिस’ नाव?
सह्याद्रीओफिस या सापाच्या प्रजातीसंदर्भातील शोधनिबंध लंडन आणि मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, नॅशनल हिस्ट्री म्युझियम आणि जर्मनी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तसंच संस्कृत शब्द सह्याद्री आणि ग्रीक शब्द ओफिस, ओफिसचा अर्थ साप होतो यावरून या नवीन प्रजातीच्या सापाला ‘सह्याद्रीओफीस’ असं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, तेजस ठाकरेंनी अनेक ओळख नसलेल्या नव्या प्रजातींना नवी ओळख मिळवून दिली आहे. ते नेहमी जंगलांत भ्रमंती करून निसर्गाच्या जैवविविधतेतील नावीन्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आत्तापर्यंत त्यांनी मासे, खेकडे, पाली, साप अशा 11 हून दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे.