क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

वय लहान, काम महान! अवघ्या 5 व्या वर्षी भारताच्या तेजस तिवारीचा बुद्धिबळात विश्वविक्रम

Tejas Tiwari Chess World Record : अवघ्या पाच वर्षाच्या मुलाने काय विश्वविक्रम केला असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, अन् तो पडणे अपेक्षित आहे. भारताच्या पाच वर्षांच्या तेजस तिवारीने या लहान वयात महान काम करून दाखवला आहे, जे भल्या-भल्यांना जमणे सोपे नाही. वयाच्या साडेतीन वर्षापासून बुद्धिबळ खेळत असलेल्या तेजसने या खेळात विश्वविक्रम केला आहे.

बुद्धिबळाची जागतिक प्रशासकीय संस्था FIDE कडून मानांकन मिळवणारा तेजस जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. तेजसचे FIDE मानक रेटिंग 1149 आहे. FIDE ने सांगितले की, उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झालेल्या पहिल्या दिवंगत धीरज सिंग रघुवंशी खुल्या FIDE रेटेड बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान त्याने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. वयाच्या अवघ्या साडेतीनव्या वर्षी घरातील सदस्यांना खेळताना पाहून तेजसला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली.

वयाच्या चौथ्या वर्षी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि लवकरच तो राज्याबाहेरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. तेजसने त्याची पहिली FIDE रेट रॅपिड टूर्नामेंट वयाच्या चार वर्षे आणि तीन महिन्यांत खेळली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये