ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

तेजश्री प्रधानला मातृशोक! आईच्या निधनाने  अभिनेत्रीच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला

मुंबई : (Tejeshri Pradhan Mother Death) लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीच्या आईचं निधन झाल्याची बातमी समोर येते आहे. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

सीमा या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. त्यांच्या आजारपणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आजारपणामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून अंथरुणाला खिळून असल्याचे सांगितले जाते. तेजश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आईला सोबत घेऊनच केली होती. त्यामुळे तिचा मोठा आधारस्तंभ आता हरपला आहे.

तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचं खूप महत्वाचं स्थान होतं. त्या प्रत्येक चित्रीकरणाला तेजश्रीच्या सोबत जायच्या. हिरॉईनची आई म्हणून नाही पण एका कोपऱ्यात जाऊन त्या निवांतपणे बसलेल्या असायच्या. तीन चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी तेजश्रीला पुढील काम स्वतः करण्याचा सल्ला दिला.

तेजश्रीने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं. ती प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाली. तेजश्रीने नुकतेच काही फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आता ऐन दिवाळीत तिला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे. आईच्या निधनानंतर तेजश्री खचून गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये