ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

के.चंद्रशेखर राव Action मूडवर! BRS ची उमेदवारांची पहिली यादी जाहीर; स्वत: ‘या’ दोन जागेवरून लढवणार!

Telangana Vidhansabha Election : काही दिवसांपुर्वी तेलंगणाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने प्रत्येक राजकिय पक्ष अॅक्सन मूडवर आहे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अन् बी.आर.एसचे सर्वासर्वे के.चंद्रशेखर राव यांनी नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, यावेळी स्वतः कामारेड्डी आणि गजवेल या दोन विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार आहेत. मंत्री कलवकुंतला तारका रामाराव (केटीआर) सिरिल्लामधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. बीआरएस पक्षाने 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

ही यादी जाहीर करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा 16 ऑक्टोबर रोजी वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला पक्षातून हाकलून दिले जाईल. त्यामुळे येते दिवस तेलंगाणाचे वातावरण तापलेलं असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये