तेलंगणातील बीआरएसचा महाराष्ट्रातील 10 ग्रामपंचायतींवर झेंडा
Gram Panchayat Election Result | तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षानं महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बीआरएसला मोठं यश मिळालं आहे. बीआरएस पक्षानं भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर बीडमधील रेवती देवकी या ग्रामपंचायतीवरही त्यांनी ताबा मिळवला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षानं महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतींवर विजय मिळवल आहे. तर भंडाऱ्यातील 66 पैकी 20 ग्रामपंचायतींचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतींवर बीआरएस पक्षानं झेंडा फडकावला आहे. त्यामुळे भंडाऱ्यात बीआरएसनं बाजी मारल्याचं दिसतंय.
तर भाजप आणि काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत दोन-दोन ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवता आला आहे. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाला आहे.