खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा रात्री भीषण अपघात; 47 विद्यार्थी…

मुंबई : (Mumbai Pune Expressway Khnadala Khopoli Students Bus Accident) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. संबंधित बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. Khandala students bus accident.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस उलटली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३५ जण जखमी झाले आहेत. त्यांना खोपोलीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली आणि आजुबाजुच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा तर दुसरी मुलगी आहे. यातल्या मुलीचं नाव हितिका खन्ना तर मुलाचं नाव राज म्हात्रे असल्याची माहिती आहे. मुंबईतील हे विद्यार्थी लोणावळ्यातील एका जल क्रीडा केंद्रात (वॉटर पार्क) सहलीसाठी रविवारी आले होते.