विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी पार पडणार्या निवडणुकीला स्थगिती द्या; ठाकरे गटाची मागणी
विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी ११ जागांसाठी होणार्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शयता आहे. १२ जुलैला होणार्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणे हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
हेही वाचा- राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार सरी
आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असं असतानाही विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी होणार्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा- सीबीएसई शाळेत मुलांना शिक्षण देता येत नसल्याने आईने उचलले टोकाचे पाऊल
ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित
सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं, हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचं प्रतिज्ञापत्र जी सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा- जळगावमध्ये पाणीपुरीतून १०० जणांना विषबाधा
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक‘मानुसार विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच १२ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या २५ जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना २ जुलैपयर्ंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ३ जुलै रोजी अजार्ंची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ५ जुलैपर्यंत मागे घेता येईल. १२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. १२ जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
3 Comments