दिल्लीतून आलेल्या आदेशानंतर अंतिम क्षणी सत्तास्थापनेचं गणित बदललं!

मुंबई : गुरुवार दि. ३० रोजी एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर शिंदे यांनी प्रथम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. अर्ध्या तासांच्या चर्चेनंतर फडणवीस आणि शिंदे यांनी साडेतीन वाजता राज्यपालांना भेटल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला.
दरम्यान, भाजपचं एक शिष्टमंडळ आणि शिंदे गटातील एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर सायंकाळी एकटे एकनाथ शिंदे हे एकटे शपथ घेणार असून मी सरकार बाहेर राहून लक्ष ठेवणार, असं देवेद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर सांगितलं. शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत असं ते म्हणाले.
मात्र, यानंतर असा प्रश्न निर्माण झाला होता की, शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असतील तर फडणवीसांचे काय? फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितलं. आपण बाहेर राहून सरकारला साथ देणार असल्याचे सांगितलं होतं. त्यांनंतर काहीच वेळात दिल्लीतील वरिष्ठांच्या आग्रहामुळं फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.



