अजिंक्य रहाणेच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, पत्नी राधिकानं दिली गुड न्यूज

मुंबई | भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकरने गुड न्यूज दिली आहे. यासंदर्भातील एक पोस्ट राधिकाने सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. अजिंक्य रहाणे वडील बनणार असल्याची माहिती कळताच चाहत्यांनी रहाणे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची बातमी दिली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर पती अजिंक्य रहाणे, मुलगी आर्यासमवेतचा एक फोटो शेअर केला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसऱ्या बाळाचं आगमन होणार असल्याचंही तिने संबंधित पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेनं 26 सप्टेंबर 2014 रोजी आपली बालपणीची मैत्रीण राधिकाशी लग्न केलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये या जोडप्याला पहिली मुलगी झाली. यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये रहाणे कुटुंबात दुसऱ्या बाळाचं आगमन होणार आहे.