ताज्या बातम्यामनोरंजन

‘या’ आहेत नेटफ्लिक्सच्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिज

सध्या प्रेक्षकांनी OTT प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. चित्रपटांपेक्षा प्रेक्षक वेब सीरिज पाहण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यात OTT वर अनेक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरील अनेक वेब सीरिजनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. या प्लॅटफॉर्मपैकी एक सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे Netflix. Netflix हे भारतीत उत्कृष्ट आशयाच्या बाबतीत उच्च स्थानावर आहे. तसेच Netflix वरील भारतीय वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तर आता आपण Netflix वरील सर्वोत्कृष्ट वेब सीरिजबाबत जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही एकदा तरी पाहिल्याच पाहिजेत.

1. सेक्रेड गेम्स – सेक्रेड गेम्स (Sacred Games) ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट सीरिजपैकी एक आहे. ही सीरिज 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. उत्कृष्ट स्टोरी, आकर्षक पात्र, जबरदस्त अॅक्टींग अशा अनेक गोष्टींमुळे ही सीरिज चांगलीच गाजली. यानंतर सेक्रेड गेम्स 2 ला देखील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. या सीरिजचा 2 सीझन 16 भागांचा असून त्याचे आकर्षक कथानक तुम्हाला स्क्रीनवर खिळवून ठेवते. ही क्राईम थ्रिलर अशी सीरिज आहे.

image 4 3

2. दिल्ली क्राइम – दिल्ली क्राइम (Delhi Crime) ही नेटफ्लिक्सवरील सर्वात गाजलेली सीरिज आहे. दिग्दर्शक रिची मेहता यांनी ही सीरिज दिग्दर्शीत केली आहे. ही सीरिज डिसेंबर 2012 च्या निर्भया दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतरच्या घटनांवर आधारित आहे. पोलीस केस-फाईल्सवर ही सीरिज आधारित आहे. या सीरिजने आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्डसमध्ये उत्कृष्ट ड्रामा सीरिज पुरस्कार जिंकला आहे.

image 4 2

3. बॉम्बे बेगम्स – बॉम्बे बेगम्स (Bombay Begums) या नेटफ्लिक्सवरील सीरिजला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. ही सीरिज जटिल पात्रांचा शोध आणि मुंबईतील लोकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित आहे. ही सीरिज मुंबईतील पाच महिलांवर आधारित आहे. तसंच नेटफ्लिक्सवरील ही सर्वोत्कष्ट सीरिजपैकी एक आहे.

image 4 1

4. डीकपल्ड – डीकप्लड (Decoupled) ही सीरिज नेफ्लिक्सवरील गाजलेली सीरिज आहे. अभिनेता आर माधवन आणि अभिनेत्री सुरवीन चावला यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. डीकपल्ड या सीरिजचे दिग्दर्शन दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी केले आहे. तर भावेश मंडालिया यांनी निर्मिती केली आहे. ही सीरिज देखील नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट भारतीय सीरिजपैकी एक आहे.

image 4

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये