ताज्या बातम्यादेश - विदेश

केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय? गॅस सिलिंडरवरील सबसिडी वाढवण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली | LPG Gas Subsidy : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला आता एलपीजी गॅस सिलिंडरवर आणखी सूट मिळू शकते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ एलपीजी गॅस सिलिंडरवर ३०० रुपये सबसिडी मिळते. येत्या काही महिन्यांत उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोलियम मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाकडून ईमेलद्वारे माहिती मागवण्यात असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढलेल्या असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ४ ऑक्टोबर रोजी ९.५ कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना १०० रुपये अनुदान मंजूर केले होते. याआधी सप्टेंबरमध्ये सरकारने देशभरातील सर्व सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरवर २०० रुपये सबसिडी मंजूर केली होती. सध्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एका एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ६०३ रुपये मोजतात, तर इतर सरासरी ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलेंडर ९०३ रुपये द्यावे लागतात.

२०१६ मध्ये योजनेची सुरूवात
गरीब कुटुंबातील गृहिणींनी चूलीवर जेवण बनवणे टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी सरकारने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने अलिकडेच २०२४-२६ या वर्षासाठी ७.५ कोटी रुपये आणि उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनसाठी अतिरिक्त १६५० कोटी रुपये जारी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये