महाराष्ट्र

आव्हान न्यायालयीन लढाईचे

छत्रपती संभाजीनगर असे नामांतर तर झाले, पण…

औरंगाबाद : एकनाथ शिंदे आणि ४० शिवसेना आमदार यांनी सेनेतून बाहेर पडून बंडखोरी केली. त्यानंतर उद्धव ठाक सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर सरकार अल्पमतात असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले. मात्र ते बहुमत मविआ सरकारला सिद्ध करता आले नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे करण्यात आले होते. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि.बा. पाटील असे करण्यात आले. असे काही महत्त्वाचे निर्णय उद्धव ठाक यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतले होते.

मात्र राज्यपालांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिल्यानंतर कॅबिनेट घेता येत नाही, तर उद्धव ठाक यांनी घेतलेली कॅबिनेट ही वैध नसल्यचे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हे निर्णय आमच्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये अधिकृतपणे घेण्यात येतील असे सांगितले व शनिवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत सीन्स-फडणवीस सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे निर्णय घेतले. मात्र नामांतरण तर झाले, पण हे निर्णय आता कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी जाहीर केल्यानंतर नामांतर विरोधी कृती समितीतर्फे तीव्र विरोध केला आहे. याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाबरोबर पुन्हा न्यायालयीन लढा देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कृती समितीचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्धार वर्ष १९९५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक यांनी केला होता. त्यावेळी मुश्ताक अहमद यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर विरोधी कृती समितीची स्थापना झाली होती. या समितीने नामांतराविरोधात पाच लाख नागरिकांच्या हरकती शासनाकडे पाठवल्या होत्या; तसेच या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, सरकारने अधिसूचना काढण्यापूर्वीच याचिका दाखल केल्याने खंडपीठाने याचिका फेटाळली होती. १९९९ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, त्यावेळी संभाजीनगरचा निर्णय रद्द केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची याचिका मागे घेतली होती. आता पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केल्याचे अहमद यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजपने मोठा आनंदोत्सव साजरा केला. औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्यानंतर भाजप शहर कार्यकारिणीतर्फे आज शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीवर फटाके फोडत आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. अडीच वर्षे या सरकारने जनतेला खेळवत ठेवल्याचा आरोप संजय केणेकर यांनी केला. शहरवासीयांना नवे ‘गिफ्ट’ देत हिंंदुत्वाच्या नावावर राजकारण करणार्‍यांना चांगलीच चपराक दिल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये