महाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ भयानक किस्सा”…अन् आयुक्त चहल रडले…

मुंबई : कोरोनाचा काळ आपल्यासाठी किती आव्हानात्मक आणि कठीण होता याचं कथन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज केलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल लिखित कोविड वॉरियर या पुस्तकाचं प्रकाश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. एकदा तर आयुक्त चहल माझ्यासमोर रडले हा किस्साही त्यांनी यावेळी कथन केला.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, वर्षभरापूर्वी कोरोना काळात भयानक बातम्या येत होत्या की, ऑक्सिजनची कमतरता आहे. एक दिवस मला आठवतोय सकाळी सकाळी चलह साहेबांचा मला फोन आला. हा खंबीर असलेला माणूस त्या दिवशी अक्षरशः फोनवरती रडत होता. त्यांना मी म्हटलं काय झालं आहे? ते म्हणाले, सर कालची रात्र माझ्या आयुष्यातली भयानक रात्र होती. त्या रात्री काय चाललं होतं ते कानावरती येत होतं. पण चहल सारखा माणूस फोनवरती रडत होता. सुदैवानं जे घडलं असतं ते आम्ही टाळलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये