चायनीज प्रेमींसाठी द चायनीज विंडो

चायनीज म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. लहान मुले असो, तरुण तरुणी असो किंवा ज्येष्ठ लोक असो प्रत्येकाला दररोजचं साधं जेवण जेऊन कंटाळा येतोच. मग प्रत्येकाला बाहेरचे चमचमीत पदार्थ खायची चव सुटतेच. त्यामध्ये चायनीज म्हटलं की प्रत्येकाचा आवडता पदार्थच. चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये कितीही लांबचा प्रवास करायला तयार असतात. खवय्यांना चायनीज खाण्याची तलफ झाली की खवय्ये एका प्रसिद्ध हॅाटेलच्या शोधात असतात, तर अशाच खाद्यप्रेमींसाठी द चायनीज विंडो हे हॅाटेल प्रसिद्ध आहे.
द चायनीज विंडो हे हॅाटेल ईश्वर भावसार यांचं आहे. तसंच या हॅाटेलमध्ये नेहमी चायनीज प्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. द चायनीज विंडो हे हॅाटेल पीके, संभाजीनगर रोड, रिफ्रेश लॉन्ड्रोमटच्या शेजारी, पीकेनगर, धनकवडी, पुणे येथे आहे. तसेच द चायनीज विंडो या हॅाटेलची व्हेज फ्राईड राईस, व्हेड फ्राईड राईस, व्हेज ट्रिपल राईस, व्हेज मन्चुरिअन राईस, व्हेज हाँगकाँग राईस, व्हेज ड्रेगन राईस, पनीर फ्राईड राईस, पनीर शेजवान राईस, मिक्स राईस, चिकन फ्राईड राईस, चिकन शेजवान राईस, चिकन मन्चुरिअन नुडल्स, ऑम्लेट नुडल्स, मिक्स नुडल्स असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत. त्यामुळे द चायनीज विंडो या हॅाटेलने खवय्यांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली आहे. तसंच या हॅाटेलने आपल्या पदार्थांची चव कायम राखली आहे. त्यामुळे खवय्ये या हॅाटेलकडे नेहमी आकर्षित होतात. सोबतच बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण आणि पदार्थांची चव यामुळे हे हॅाटेल सर्वांच्या आवडीचं बनलं आहे.
विशेष सांगायचं झालं तर द चायनीज विंडो या हॅाटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडणारे आहेत. सोबतच या हॅाटेलचे आदरातिथ्य खवय्यांना पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडते. तर तुम्हाला चविष्ट चायनीज पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा सुट्टीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्र मैत्रिणीं सोबत, परिवारासोबत टाईम स्पेंड करायचा असेल, पार्टी करायची असेल तर आवर्जून द चायनीज विंडो या हॅाटेलला स्वादिष्ट चायनीझ पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भेट द्या.