ब्राह्मणांचे ब्राह्मणेतर सामाजिक विकासात मोठे योगदान
पुणे | कधी एकेकाळी काही मुठभर ब्राह्मणांच्या अन्यायाच्या कथाची पुनरावृत्ती करत या समाजाला टीकेचे धनी केले जाते, परंतु सर्वच महापुरुषांच्या जीवनामध्ये एकातरी ब्राह्मण व्यक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे इतिहासात दिसते . ब्राह्मण व्यक्ती आणि पात्रे महापुरुषांच्या आयुष्यातून काढून टाकता येत नाहीत, सर्व धर्मीयांना मंदिरे खुले करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ब्राह्मण नेतृत्वांसह महात्मा फुले यांच्या उदारमतवादी शिक्षण धोरणासाठी निवासस्थानच नव्हे तर त्यासाठी आर्थिक तरतूद करणारे देखील भिडे हे देखील ब्राह्मण होते. स्वातंत्र्यसंग्रामासह प्रत्येक सामाजिक आणि क्रांतिकारक घडामोडींच्या शीर्षस्थ स्थानी एक तरी ब्राह्मण नेता आहेच , परंतु याचा गर्व न करता या योगदानाची परंपरा लक्षात ठेवून आपलेही वर्तन घडावे, असा सूर बुद्धिवंतांच्या मेळाव्यात निघाला.
राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या पुणे शाखेच्या वतीने बुद्धिवंत मेळाव्याचे आयोजन येथील सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पुण्यातील नामवंत तीनशे निमंत्रितांनी यात सहभाग घेतला. या संवादात, सुरेश नाईक (ISRO Rtd chairman, Scientist ), सुप्रिया बडवे (बडवे इंडस्ट्री), सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, दाते पंचांगचे सुधीर दाते, दीपक शिकारपूर (IT तज्ज्ञ), संतोष जोशी (manufacturing industry), अनिरुद्ध बडवे (संपादक राष्ट्रसंचार) , प्रशांत पानसरे (IT कंपनी owner), डॉ सचिन नागापूरकर (हर्डीकर हॉस्पिटल) श्री मिलिंद संपगावकर , ॲड. कुणाल टिळक , डॉ अभय कुलकर्णी, दीपक करंदीकर (MCCI President), मकरंद टिल्लू (आंतरराष्ट्रीय स्तरावरील हास्य क्लबचे निर्माते ), जस्टीस्ट चंद्रचूड आदींनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांची प्रकट मुलाखत अनिरुद्ध बडवे यांनी घेतली.
या समाजाने कधीच आरक्षणाची भीक मागितली नाही आणि आपल्याला अशा न टिकणाऱ्या कुबड्या घेण्याच्या आवश्यकता नाही. आपण स्व सामर्थ्याने उजळून निघू , केवळ स्व जातीचा विचार न करता इतरांनाही सामावून घेत विद्यादान आणि त्यातून अर्थ सक्षमता हा आपला अजेंडा असला पाहिजे.
स्वातंत्र्यसंग्रामासह प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये ब्राह्मण समाजाच्या महापुरुषांचे मोठे योगदान आहे. या समाजाच्या सहभागाशिवाय देशाच्या राजकीय, सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहास लिहिता येणार नाही , याचा अभिमान असला तरी आपण याचा गर्व करू नये आणि विद्यादानाची , इतरांना शहाणे करून सोडण्याची ही आपली संस्कृती आणि परंपरा लक्षात घेता आपण देखील तसेच आचरण ठेवावे .
असे अनेक ठराव यावेळी संमत झाले.
ग्रामीण भागातील गरीब ब्राह्मण कुटुंबीयांच्या विद्यार्थ्यांसाठी महासंघाने पुणे आणि मुंबईसारख्या शहरात विशेष प्रकल्प राबवावेत. समाजातूनच पैसा एकत्रित करून आर्थिक सक्षमतेचे पर्याय उभे करावेत . कोणासमोरी हात न पसरता आपणच हे सामर्थ्य निर्माण करूया . भविष्यात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह , गोशाळा , नोकरीसाठी नेमकी माहिती मिळण्याची केंद्रांची स्थापना तसेच माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प , नोकरी विषयक निशुल्क मार्गदर्शन आणि सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी एक मध्यवर्ती गाईड सेंटर काढण्याचे निर्णय यावेळी घेण्यात आला.
जिल्हाध्यक्ष मंदार रेडे , मकरंद माणकीकर, विश्वनाथ भालेराव, ब्रिजमोहन शर्मा,मनोज पंचारिया , सुनील पारखी या मेळाव्याचे औचित्य पूर्ण आयोजन केले. पुष्कर पेशवा (पेशवे वंशज), प्रफुल नेवाळकर (झाशीची राणी वंशज), नितीन फडणीस (सरदार लोहोकरे वंशज), कुंदन कुमार साठे (थोरले बाजीराव प्रतिष्टान) असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.