आचारसंहितेमुळे विकासकामांना ‘ब्रेक’; तब्बल ५०० कोटींची कामे रखडली
लोकसभा आणि नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा जोरदार फटका विकासकामांना बसला असून त्यांना ‘ब्रेक’ लागला आहे, महापालिकेचे अंदाजपत्रक तब्बल साडेअकरा हजार कोटी रुपयांचे असतानाही त्यातील अवघी ६७५ कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. त्याची गंभीर दखल खुद्द महापालिका आयुक्त डॉ. राजेश भोसले यांनी घेतली असून या विकासकामांना आता ‘ गती’ देण्याचे आदेश त्यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील ६७५ काेटी रुपयांची कामे मार्गी लागली आहे. यावर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यातील कालावधी हा लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेत गेला. त्यापाठाेपाठ ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर महिन्याचा कालावधी हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेला. या दाेन्ही निवडणुकींच्या कामासाठी महापािलकेचे पाच हजाराहून अधिक कर्मचारी हे गुंतले हाेते. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा विकास कामांवर झाला.
महापािलकेचे सुमारे साडे अकरा हजार काेटी रुपयांचे अंदाजपत्रक असून, यामध्ये देखभाल दुरुस्ती आणि इतर खर्चासाठी सुमारे साडे अठराशे काेटी रुपयांची तरतुद आहे. तसेच भांडवली आणि विकास कामांसाठी सुमारे ५ हजार ९३ काेटी रुपयांची तरतुद आहे. निवडणूक आचारसंहीतामुळे ही तरतुद खर्च हाेण्यात अडचण आली आहे.
यासंदर्भात आयुक्त डाॅ. भाेसले यांनी महापािलकेच्या पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पथ विभाग आदी नागरी सुविधा पुरविणाऱ्या विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. महापािलका निवडणुकीची आचारसंहीता पुढील काही महीन्यात लागण्याची शक्यता अाहे. अ्र्थिक वर्षातील शेवटचे चार महीनेच शिल्लक राहीले आहे.
काही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही, काही वेळा फेरनिविदा काढण्याची वेळ आली, अशी अनेक कारणे आहेत. पुढील काळात कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या चार महीन्यात अंदाजपत्रकात तरतुद केलेल्या विकास कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.