‘द केरळ स्टोरी’चा दुसरा भाग? दिग्दर्शकाने दिले मोठे संकेत

The Kerala Story : अभिनेत्री अदा शर्माचा (Adah Sharma) चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी चित्रपटाला मिळणाऱ्या या जबरदस्त प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे देखील चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत चर्चेत आहेत. नुकताच सुदीप्तो सेन यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतमध्ये ते म्हणाले की, अनेक चित्रपट निर्माते हे माझ्याकडे पैसे घेऊन येत आहेत आणि मला द केरळ स्टोरी 2 ची आॅफर करत आहेत. माझ्यासाठी खरोखरच ही खूप जास्त आनंदाची बाब आहे. मी द केरळ स्टोरी चित्रपटावर सात वर्ष काम केले.
माझ्याकडे बऱ्याच स्टोरी आहेत. द केरळ स्टोरी चित्रपटाला अशाप्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळेल, याची कल्पना मला अगोदरच होती. द केरळ स्टोरी चित्रपटामुळे मला गर्व वाटत असून माझा आत्मविश्वास देखील वाढलाय. सुदीप्तो सेन यांचे बोलणे ऐकून हा अंदाजा लावला जात आहे की, लवकरच द केरळ स्टोरी चित्रपटाला सीक्वल प्रेक्षकांचा भेटीला येऊ शकतो. धमाकेदार ओपनिंगही द केरळ स्टोरी चित्रपटाने केलीये.
एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन यांनी सांगितलं, ‘मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे अजून खूप कथा आहेत ज्या मला लोकांना सांगायच्या आहे. लोकांनी खूप कौतुक केल्यानंतर मला विश्रांती घ्यायची नाही. हा चित्रपट यशस्वी होणार हे मला माहित होतं. मी या चित्रपटावर सात वर्षे काम केले आहे.’
सुदीप्तो सेन यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, बरेच लोक विचारत आहेत की ‘द केरळ स्टोरी’ची कथा केवळ महिलांबद्दल का आहे, पुरुषांबद्दल का नाही? याला उत्तर देताना दिग्दर्शक म्हणाला, ‘ही सुरुवातीपासूनच तीन मैत्रिणींची कथा होती. याबाबत कोणतीही पूर्वनियोजित रणनीती नव्हती. आता काही निर्मात्यांनी पुरुषांच्या कट्टरतावादावर द केरळ स्टोरीचा सिक्वेल म्हणून एक प्रोजेक्ट ऑफर केला आहे.’