ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

Sharad Pawar: “अजित पवार मुख्यमंत्री होणार हे दिवास्वप्न”; आबांची आठवण काढत शरद पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचंच सरकार येणार, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Sharad Pawar – गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू आहेत. तसंच बऱ्याच ठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील लावण्यात आले होते. अशातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार हे दिवास्वप्न असल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे. शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसंच शरद पवार असं का म्हणाले याबाबत त्यांनी स्वत: स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

अजित पवार मुख्यमंत्री होणं हे दिवास्वप्न आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाहीये. तसंच राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) एकदिलानं काम करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांना याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नच, असं तुम्ही का म्हणालात? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी एक उदाहरण देतो. आमचे एक सहकारी आर.आर.पाटील, ते प्रत्येक सभेत म्हणायचे की शरद पवार प्रधानमंत्री झाले पाहिजेत. पण मी त्यांना एकदा सांगितलं की, माझ्याकडे फक्त दहा खासदार आहेत. 10 खासदारांच्या शक्तीवर प्रधानमंत्री व्हायला जायचं हे योग्य आहे का?

तसंच आज राज्याच्या विधानसभेत अधिकार गाजवायचा असेल तर 145 आमदारांची शक्ती लागते. जर 145 आमदारांची शक्ती आपल्या सोबत नसेल किंवा इतर पक्षांच्या मदतीनं देखील 145 पर्यंत आपण पोहचू शकत नसेल तर मुख्यमंत्री होणं हे दिवास्वप्नच आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये