ताज्या बातम्यापुणे

खराब हवामानामुळे पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले

पायलटसह तीन प्रवासी जखमी

पुणे जिल्ह्यातील पौडजवळ AW १३९ नावाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत हेलिकॉप्टरचा पायलट जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई वरून हैदराबादला जात असल्याची माहिती आहे.

पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच तीन सहकारी असल्याची माहिती आहे, ते यामध्ये जखमी झाले आहेत.त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

हेलिकॉप्टर मधील प्रवाशी

1) आनंद कॅप्टन (जखमी)
2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर)
3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)
4) एस पी राम (प्रकृती स्थिर)

अपघात घडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये