ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

कपिल शर्मा’ला आणखी एक मोठा झटका! कृष्णा नंतर ‘हा’ प्रसिद्ध कॉमेडियनही पडणार बाहेर?

मुंबई : (The Kapil Sharma show sidharth sagar quit the show) गेल्या सात वर्षांपासून कॉमेडीच्या माध्यमातून लोकांचे मनसोक्त मनोरंजन करणारा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शो नं नव्या सिझनसोबत कमबॅक केलं होतं. त्यावेळी कृष्णा अभिषेकी कमी पैसे ऑफर दिली गेली म्हणून शोमधून बाहेर पडला. त्यानंतर चंदन प्रभाकर देखील शो मधून बाहेर पडला कारण त्याला सिनेमा मिळाला. आता आणखी एक कॉमेडियन शो ला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे.

सिद्धार्थ सागरनं कपिल शर्माचा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे.
समोर आलेल्या बातमीनुसार कळत आहे की, सिद्धार्थ सागरला जे मानधन दिलं जातं त्यावरनं त्याचे निर्मात्यांसोबत काही खटके उडाले आहेत. सिद्धार्थला त्याचं मानधन वाढवून हवं होतं. पण निर्माते यासाठी तयार नव्हते. या कारणानं सिद्धार्थनं शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धार्थ द कपिल शर्मा शो च्या शूटिंग निमित्तानं खरंतर मुंबईला शिफ्ट झाला होता. पण आता तो त्याच्या घरी म्हणजे दिल्लीला परतल्याचं कळत आहे. शो मध्ये आता सिद्धार्थ परत येण्याची आशा खूपच कमी असल्याचं बोललं जात आहे. सिद्धार्थ शो मध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून दिसायचा. कधी तो ‘सेल्फी मौसी’ तर कधी ‘उस्ताद घरछोडदास’ तर कधी ‘फनवीर सिंग’ बनून शो ला मजेदार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलायचा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये