“2009 मध्येच महाविकास आघाडी झाली असती”; सेनेच्या माजी खासदाराचा खुलासा!

पुणे – 2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती जवळपास अंतिम झाली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, संजय राऊत मला म्हणाले की, शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपली युतीची बोलणी सुरू आहेत.
दरम्यान, युतीची बोलणी सुरू असताना दोन दिवसांनी शरद पवार यांची सभा आहे, तीदेखील रद्द करायला सांगा असे आपण राऊत यांना सांगितले. त्यावर राऊत यांनी आता आपण त्यांना (पवारांना) कसं काय सांगणार? मग मी म्हणालो, मला का सांगताय, असं म्हणून मी निघून आलो. काही वेळानं फोन आला, उद्धव ठाकरे साहेब येत आहेत, सभेची तयारी करा. मग त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती अशी माहिती आढळराव यांनी दिली.