नशा व व्यानाबद्दल घरी आई व पत्नी ला सांगून भडकवणाऱ्या मित्राचा दोन मित्रांनीच खून केला आहे. हा खून गुरुवारी (दि.19) हडपसर येथील रामोशी आळी येथे उघडकीस आला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी 12 तासाच्या आत दोन्ही मित्रांना अटक केली आहे.
अमोल ऊर्फ भावजया मारुती माने (वय-39 रा. हडपसर) असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव गणेश लबडे (वय 31 रा. हिंगणे आळी, हडपसर गाव) ज्ञानेश्वर दत्तु सकट (वय 27 रा. रामोशी आळी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत इसम हा केटरिंग व्यवसाय करत होता, तो एकटाच राहत होता. मयत याला फोन लावला असता तो फोन उचलत नव्हता यावेळी त्याच्या घरी नागरिक गेले असता ,अमोल माने हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
हडपसर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वैभव याला हडपसर येथून तर ज्ञानेश्वर याला सोलापूर येथून अटक केली .त्यांच्याकडे अधिक तपास केला असता अमोल व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना नशापाणी करण्याचे व्यसन होते.
मयत हा आरोपीस असलेल्या व्यसानाबद्दल वेळोवेळी आरोपीच्या आईला व पत्नीला सांगत असे, त्यामुळे आरोपी वैभव याचे त्याच्या आई व पत्नी बरोबर वाद होत होते. मयत हा वेळोवेळी आरोपी करत असलेल्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीस भडकवत असल्यामुळे आरोपीच्या मनात मयताबाबत राग होता. त्या रागातून आरोपीने हा खून केला असल्याची कबुली दिली.
ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दिपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अमोल जाधव यांनी केली आहे.