ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी भरच!

पालिकेचा पर्यावरण अहवाल; शहरात ३५ लाख ९४ हजार वाहने?

पुणे | Pune News – पुणे (Pune) शहरातील वाहनांच्या संख्येचा आकडा फुगत चालला असून, २०२२ मध्ये २ लाख ५५ हजार ७५७ नवीन वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे जून २०२३ पर्यंत एकूण ३५,९४,१३२ वाहनांची नोंद झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने शहरातील खासगी वाहनांची संख्या २०२२ मध्ये दुपटीने वाढली आहे. परिणामी, जून २०२३ अखेर शहरातील खासगी वाहनांचा आकडा तब्बल ३५ लाख ९४ हजार झाला आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दरवर्षी शहराच्या पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयार केला जातो.

सन २०२२-२३ वर्षाचा पर्यावरण अहवाल महापालिकेने बुधवारी जाहीर केला. या अहवालात शहरातील वृक्ष, पक्षी, कचरा, पाणी, वायू प्रदूषण आदी माहिती देण्यात आली आहे. तसेच पर्यावरण सुधारण्यासंदर्भात केल्या जाणार्‍या उपाययोजनांचीही माहिती दिली आहे.

प्रशासनाकडून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, खासगी वाहनांचा वापर अद्याप कमी होताना दिसत नाही. जून २०२३ पर्यंत एकूण ३५ लाख ९४ हजार १३२ वाहनांची नोंद झाली असून, सन २०२१ (१ लाख ६९ हजार ५५२) च्या तुलनेत सन २०२२ मध्ये नवीन २ लाख ५५ हजार ७५७ वाहनांची भर पडली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पीएमपीएलच्या एकूण २ हजार ७९ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी १ हजार ४२१ बसेस सीएनजी इंधनावर तर ४५८ इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.

शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कशी व्हावी यासाठी महानगरपालिका, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व स्वयंसेवी संस्था मिळून क्लायमेट अ‍ॅक्शन सेल तयार करण्यात आला आहे.

शिवाजीनगर आणि हडपसर येथे हवा प्रदूषण जास्त आढळून आले आहे. शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक २६३ प्रजाती, तर एआरएआय टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये