“एक गट बाहेर पडला आहे, पण मूळ पक्ष आमच्याकडेच”, शरद पवार गटाचा दावा
नवी दिल्ली | Sharad Pawar – आज राष्ट्रवादी (NCP) पक्ष कोणाचा होणार? यावर प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीदरम्यान शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) युक्तीवाद सादर केला जात आहे. तर या सुनावणीसाठी शरद पवार स्वत: निवडणूक आयोगात (Election Commission) दाखल झाले आहेत.
या सुनावणीदरम्यान शरद पवार गटानं युक्तीवाद सादर केला आहे. यावेळी एक गट बाहेर पडला आहे, पण मूळ पक्ष आमच्याकडेच आहे, असा दावा शरद पवार गटानं केला आहे. तसंच पक्षाची स्थापना ही शरद पवारांनी केली आहे. शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचे युक्तीवाद डावलता येणात नाहीत. तर राज्यात आणि राज्याबाहेरही पक्ष कुणाचा आहे? हे सर्वांना माहिती आहे, असा दावाही शरद पवार गटानं केला आहे.
पक्षाच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका आहे. तर पक्षाची भूमिका अजित पवार गटानं पाळली नाही, असा युक्तीवाद शरद पवार गटानं केला. तसंच 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा शरद पवारांना आहे, असा दावाही शरद पवार गटाकडून करण्यात आला.