नेपाळमधील त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केलेले विमान काही क्षणातच कोसळले. ही घटना बुधवारी (दि. २४ ) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. कोसळलेले ९N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते.
पायलट कॅप्टन मनीष शाक्य हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूर्या एअरलाइन्सचे विमान बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काठमांडू येथून पोखराला जात होते. दरम्यान विमान त्रिभुवन विमानतळावर उतरले. तिथून उड्डाण भरताना काही क्षणातच विमान कोसळले. यावेळी विमानात सूर्य एरलाईन्सचे १७ कर्मचारी आणि दोन क्रू मेंबर होते. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. ही आग तात्काळ विझवण्यात आली. अपघात नेमका कशामुळे घडला, याचे कारण अद्याप समोर आले नाही. १९ जणांपैकी १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर विमानाचा कॅप्टन गंभीर जखमी झाला आहेत.