ताज्या बातम्यारणधुमाळी

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; बुधवारी होणार सुनावणी

मुंबई : राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली, आणि राज्यात एका नव्या राजकीय नाट्याला सुरूवात झाली. अनेक घडामोडींनंतर अखेर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. दरम्यान, आज निकालाचे लिखाण पूर्ण होऊ न शकल्याने आणि उद्या ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवारी (दि. 4) सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

१२४ अ कलमानुसार राणा दाम्पत्याविरोधात , राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने आणि युक्तीवादाचे वाचन पूर्ण होऊ न शकल्याने दाखल जामिन अर्जावरील सुनावणी आता बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये