ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा खरा आरोपी प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वेच, वरूण सरदेसाईंचा दावा

मुंबई | Sheetal Mhatre Viral Video – सध्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा आमदार प्रकाश सुर्वेंसोबतचा (Prakash Surve) एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे (Raj Surve) यांनी तो व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा खरा आरोपी प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे आहेत. त्यामुळे त्यांना अटक व्हायला पाहिजे, अशी मागणी वरूण सरदेसाईंनी केली आहे.

वरूण सरदेसाई म्हणाले की, मुंबई पोलीस सक्षम असून ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडीओ राज सुर्वेंनीच केला आहे. जे कार्यकर्ते आणि नेते उद्धव ठाकरेंसोबत कायम आहेत. त्यांच्यावर रोज आरोप होतात, कारवाया केल्या जात आहेत. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. पण ते नेते जर भाजपमध्ये गेले, तर त्यांच्यावरील कारवाया थांबतात. जनता हे सगळं पाहतीये.

भाजपचा ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी पराभव होत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही काय होईल हे सुस्पष्ट आहे. तसंच गेले अनेक वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एका विशिष्ट विचारसरणीचा कब्जा आहे. कधीही आम्ही येथील सिनेट निवडणुकीला गांभीर्यानं घेतलं नाही. पण आता आम्ही सिनेटच्या दहा जागांपैकी तीन जागा लढवत आहोत. त्या तीनही जागा आणि उर्वरित सर्व जागा महाविकास आघाडीच जिंकेल, असा विश्वासही वरूण सरदेसाईंनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये