ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“‘म्हणूनच’ ठाकरेंनी द्रोपदी मुर्मूंना पाठिंबा दिला”; नाराज यशवंत सिन्हांनी केला खुलासा

मुंबई-President Yashwant Sinha : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळानंतर सर्वांच लक्ष आता राष्ट्रपती निवडणुकीकडे लागलेलं आहे. भाजप उमेद्वार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा द्यायचा की कॉंग्रेस उमेद्वार यशवंत सिन्हा यांना, यावर देशभरात राजकारण सुरु असलेलं दिसत आहे. भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी देखिल कॉंग्रेसला पाठींबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली जात होती. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप उमेद्वार द्रोपदी मुर्मू यांनाच पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेल्या शिवसेनेने भाजपला पाठींबा देण्याचं जाहीर केल्यामुळे कॉंग्रेस नेते नाराज आहेत. दरम्यान, खुद्द राष्ट्रपती पदाचे कॉंग्रेसचे उमेद्वार यशवंत सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उध्दव ठाकरे यांनी भाजपला पाठींबा देण्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे. गुवाहाटीत माध्यमांसमोर ते बोलत होते.

सिन्हा म्हणाले की, “केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार पाडत आहे. महाराष्ट्रात देखील तेच घडलं. महाराष्ट्रातील नेत्यांना इथे गुवाहाटीत आणण्याचं कारण एकच होतं की इथे भाजपचं सरकार आहे. त्यामुळे इथे आलेल्या आमदारांना भाजपकडून मदत करण्यात आली.” उद्धव ठाकरेंच्या मुर्मू यांना पाठींबा देण्याच्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रपती निवडणुकीत पाठींबा देण्यासाठी भाजपकडून दबाव आणला जात आहे.’ त्यामुळे ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज असलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निष्ण साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये