समलैंगिक जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Same Sex Marriage | आज (17 ऑक्टोबर) समलैंगिक विवाहाच्या (Same Sex Marriage) वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे. समलैंगिक विवाहाच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दहा दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तर आता तब्बाल पाच महिन्यांनंतर या प्रकरणाचा निर्णय सुनावला जाणार आहे. यादरम्यान समलैंगिक जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार असल्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
निकालाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मूल दत्तक घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशातील अविवाहीत जोडप्यांसोबतच समलैंगिक जोडपेही एकत्रितपणे मूल दत्तक घेऊ शकतात, असं विधान डीवाय चंद्रचूड यांनी केलं आहे. त्यामुळे आता समलैंगिक जोडप्यांना देखील मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे.
यावेळी सीजेआय म्हणाले की, काही प्रकरणांमध्ये एकद्याच्या जोडीदार निवडण्याच्या अधिकारावर कायदेशीर बंधनं असतात. पण समलैंगिक जोडप्यांना देखील इतरांप्रमाणे त्यांच्या जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे. तसंच अविवाहित जोडप्यांना मूल दत्तक घेण्यापासून रोखणाऱ्या तरतुदी चुकीच्या आहेत. त्यामुळे समलैगिंकांनाबाबतही भेदभाव होतो. त्यामुळे सीजेआय समलैंगिक जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार देण्याच्या बाजूनं आहेत.