शुक्रवारी सकाळी एका प्रचारसभेदरम्यान जपाचे माजी आणि जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले पंतप्रधान यांच्यावर प्राणघातक गोळीबार करण्यात आला होता. त्यांनतर तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र तब्बल पाच तास मृत्यूशी झुंझ देत दुपारी एक नंतर त्याचं निधन झालं. त्यानंतर जगभरातून तसंच भारतातून देखील दुःख व्यक्त करण्यात आलं.
शिंजो आबे यांच्यावर सभेदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर गोळीबार करणारी व्यक्ती ही त्यांच्यापासून १० फुट अंतरावरच उभी होती. घरगुती पद्धतीने तयार करण्यात आली असेल अशा प्रकारच्या बंदुकीतून त्याने गोळी झाडली होती. सुरक्षा रक्षकांनी त्या ४१ वर्षीय गुन्हेगाराला तत्काळ ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर गुन्हेगार व्यक्तीचं नाव Tetsuya Yamagami असं असून ती निवृत्त लष्करी अधिकारी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गोळी झाडणाऱ्या व्यक्तीनं गुन्हा करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. मी समाधानी नव्हतो त्यामुळं मी हत्या केली असं गुन्हेगाराने सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे.