Same Sex Marriage: समलैंगिक विवाहाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Same Sex Marriage Verdict : समलैंगिक विवाहाबाबत (Same Sex Marriage) सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय कायद्यानुसार समलैंगिक व्यक्तींना लग्न करण्याची परवागनी नाहीये. त्यामुळे देशात समलैंगिक विवाहांना मान्यता मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर आता सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला कायेदशीर मान्यता देण्याबाबत निकाल दिला आहे. समलिंगी विवाहांना सर्वोच्च न्यायालयानं कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे.
समलैंगिक विवाहाबाबत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये 3 विरूद्ध 2 असा निकाल देण्यात आला. हा ऐतिहासिक निर्णय पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं दिला आहे. हा निकाल सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमुर्ती पीएस नरसिम्हा, न्यायमुर्ती हिमा कोहली, न्यायमुर्ती एस के कौल आणि न्यायमुर्ती रविन्द्र भट यांच्या घटनापीठानं दिला आहे.
देशभरातील 21 जोडप्यांनी समलैंगिक विवाहाबाबत याचिका दाखल केला होती. त्यांनी दाखल केलेल्या या याचिकांवर सुप्रीम कोर्टानं एकत्रित सुनावणी केली होती. सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं या विवाहांना कडाडून विरोध केला होता. जर समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली तर घटस्फोट, वारसाहक्क आणि संपत्ती हस्तांतरणाचे प्रश्न उद्भवतील, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. आता देशात समलैंगिक विवाहाला कायेदशील मान्यता नाहीये. त्यामुळे विवाहाला मान्यता नसल्यामुळे अशी जोडपी मुल दत्तक घेणे आणि सरकारच्या इतर योजनांपासून देखील वंचित राहतात.
https://www.instagram.com/p/CyfekdhMTyO/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==