स्व समुपदेशनाची तिसरी पायरी मेंदूला अचूक विचाराची सवय लावूया

अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग

मागील लेखामध्ये बाह्यमन आणि अंतर्मन एकमेकावर कसे अवलंबून असते हे मेंदूविज्ञानाच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलेले आहे. आपल्या बाह्यमनात येणारे 80% विचार हे अंतर्मन पुरवित असते. आपल्या मनाची प्रसन्नता किंवा उदासीनता, आळस किंवा प्रोत्साहन, सकारात्मकता किंवा नकारात्मकता ही अंतर्मनाने पुरविलेल्या विचारावर अवलंबून असते. सोबतच बाह्यमनाने वारंवार सूचना देऊन जे पाहिजे ते विचार अंतर्मनात सुद्धा तयार करता येते. ते एक कौशल्य आहे. सोबतच आपल्या विचारानुसार आपली मानसिकता तयार होत असते. मानसिकतेनुसार डोपामाईन, सेरोटोनीन, कार्टेसॉइल, ऑक्सोटोसिन, एन्ड्रोफिन ही रसायने मेंदुमधून स्त्रावत असतात. या रसायनाचा परिणाम म्हणून आपली शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता ठरत असते. आपले आरोग्य, स्वभाव, सवयी, व्यक्तिमत्व, प्रभावक्षेत्र हे सर्व आपली मानसिकता आणि त्यामधून स्त्रवणारी रसायने यावर अवलंबून असते.

समजा आपण सकाळी उठल्याबरोबर आवडती गाणी लावली, सकाळची प्रसन्न प्रार्थना, भक्तिगीते, शौर्यगीते लावली आणि हीच गाणी गुणगुणत तोंडावर पाणी मारायलो, ब्रश करीत करीत गाण्याच्या विश्वात रमून गेलो तर आपल्या अंतर्मनातून कोणते विचार निर्माण होतील. बाह्यमनाचा एक विचार पूर्ण करण्यासाठी किमान ३०० विचार तयार होत असतात असे मेंदू विज्ञान सांगते. याउलट मला खूप आळस आलाय, माझी झोप पूर्ण नाही झाली, आज माझं शरीर जड झालय असे बाह्यमनात विचार आले तर हे पण विचार पूर्ण करण्यासाठी अंतर्मनात ३०० विचार निर्माण होतच असतात. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्याबरोबर जे विचार तुमच्या बाह्यमनात निर्माण होतात ते विचार पूर्ण करण्यासाठी अंतर्मन पूर्ण शक्तीने तयार असते. तुमच्या बाह्यमनातील विचाराचा परिणाम दिवसभर तुमच्यावर प्रभाव गाजवत असतो. सोबतच बाह्यमनात कोणते विचार निर्माण करायचे हे पूर्णपणे आपल्या हातात असते. हीच आपल्या मेंदूला विचार करायची सवय लावण्याची ट्रिक्स आहे. अशा अनेक ट्रिक्स आहेत.

आपली मानसिकता किंवा आपला मूड कसा बनवायचा, त्यासाठी वातवरण कसे तयार करायचे, त्यासाठी मी काय करावे असा विचार सातत्याने करावा. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळविण्यासाठी वातावरण निर्मिती होते. त्यामधून असंख्य विचार तयार होतात, याच विचारातून न्यूरॉन्स पेशी एक्टिव्ह होतात. कौन्सलिंग करताना अशा अनेक क्लाइंट भेटतात, त्यांना पुरेशी झोप येत नसते, मनात अस्वस्थता निर्माण होत असते, नेहमी कशाची तरी भीती किंवा काळजी त्यांना असते. ते नैराश्यात जीवन जगत असतात. परंतु आम्ही अशा व्यक्तींच्या विचारावर काम करून त्यांचे जुन्या विचारांचे पॅटर्णचा प्रभाव कमी करून नवीन विचार आमचे कौशल्य वापरून रुजवतो. असे केल्याने मेंदूला सतत जे पाहिजे तेच विचार करण्याची सवय लागते. अशाच प्रकारे आपण मेंदूला सवय
लावत असतो.

Sumitra nalawade: