ताज्या बातम्यामनोरंजन
वारं खुप सुटलंय… मनसेचा सभेपूर्वी आणखी एक टीझर; पाहा व्हिडीओ

मुंबई : उद्या संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. यासंदर्भातला मनसेकडून आणखी एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी मनसेकडून म्हणजेच 9 एप्रिल रोजी कारारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करणयात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एक टीझर रिलीज करण्यात आला असून, यामध्ये ”वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे” असा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या ठाण्यातील सभेत या सर्व राजकीय प्रतिक्रियांना उत्तर देणार असल्याची चर्चा आहे.