वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ‘इला फाउंडेशन’चे काम कौतुकास्पद

वाल्हे : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी इला फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग यांच्या ‘विलू सी पूनावाला हॉस्पिटल फॉर वाइल्ड लाइफ’ या हॉस्पिटलचे उद्घाटन सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सतीश मुंद्रा म्हणाले, “ग्रामीण भागातील निसर्गाचे व निसर्गातील वन्यजीवांचे संगोपन करणाऱ्या इला फाउंडेशनला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या विलू सी. पूनावाला हॉस्पिटल फॉर वाइल्ड लाइफ मुळे मोठी मदत होणार आहे.

काही आजाराने किंवा अपघाताने जखमी झालेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले असल्याचे ते म्हणाले. पुरंदर तालुक्यातील वाल्हे जवळ असलेल्या पिंगोरी येथे ‘इला हॉब’ या नावाने संस्थेचे ग्रामीण केंद्र येथील माणसांच्या दवाखान्यासाठी तसेच पर्यावरण प्रकल्पासाठी ओळखले जाते. याप्रसंगी, सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक सतीश देशपांडे, विल्लू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग, पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक व्ही. डी. आहेर, डॉ. विनय गोऱ्हे, डॉ. फिरोज खंबाटा, डॉ. लायला खंबाटा, डॉ. लीला फर्नांडिस आदी उपस्थित होते.

Nilam: