ताज्या बातम्यापुणे

तरुणाला कपडे काढून नाचायला लावले आणि नंतर… पुण्यातील येरवडा येथील धक्कादायक प्रकार

पुणे | पुण्यात येरवडा येथे तरुणाला कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाहीतर नाचतानाचा नग्न व्हिडिओ (Nude Video) काढून तो गावाकडील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करुन तरुणाची बदनामी केली. तसेच त्याच्याकडून जबरदस्तीने 60 हजार रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार येरवडा येथे 13 जुलै 2023 रोजी रात्री अकरा वाजता घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंत राव भोसले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 33 वर्षीय पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी सध्या फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ राजभोज आणि सुभाष भोसले हे अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव प्रवरा नगर येथील आहेत. आरोपी सोमनाथ राजभोज याने फिर्यादीला त्याचा भाऊ फ्लॅटवर आला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी फिर्यादीला बोलावून घेतले. फिर्यादी हे फ्लॅटवर गेले असता, त्याला आरोपींनी मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावरील कपडे हे जबरदस्तीने काढून घेत त्याला नग्न केले.

आरोपी हे यावरच थांबले नाहीत तर त्याला नग्न अवस्थेत नाचायला देखील लावले. यानंतर आरोपीचे व्हिडिओ शूटिंग करत हा व्हिडिओ गावकडील मित्रांच्या ग्रुपवर पाठवत त्याची बदनामी केली. तसेच फिर्यादी जवळील ६० हजार रुपयांची रोख देखील आरोपींनी लुबाडली. दरम्यान, यानंतर देखील त्यांनी फिर्यादीला त्रास देणे सुरच ठेवले. यामुळे याला कंटाळून फिर्यादीने येरवडा पोलिसांत जात या प्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी चारही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये