“पात्र असणं आणि जबाबदारी देणं यात अंतर आहे”; धनंजय मुंडेंचा फडणवीसांना टोला!

मुंबई : Dhanajay Munde On Devendra Fadnavis | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून पक्षांमध्ये चांगलचं राजकारण पेटलं आहे. उमेदवारीवरून एकमेकांवर टीका टिपण्णी सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आणलं होतं. याचाचं धागा पकडून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (NCP Leader) आणि आमदार धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
धनंजय मुंडे (Dhanjay Munde) म्हणाले की, फडणवीस म्हणतात पंकजा मुंडे( Pankaja Munde) सर्व पदासाठी पात्र आहेत. परंतु जबाबदारी देणं आणि पात्र असणं यात अंतर आहे. फक्त बोलून काहीच होणार नाही. पंकजा मुंडे या सर्व पदांसाठी पात्र असतील हे खरं असलं तरीही दुसर कोणीच या पदासाठी पात्र नाही असं म्हणू नये, असा टोला मुंडे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की, पक्ष जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल. मला उमेदवारी लढण्याची अजिबात इच्छा नाही. ज्यांना उमेदवारीच तिकीट मिळालं याचा मला आनंद आहे. राजसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पियूष गोयल यांना तिकीट मिळणार हे आधीच अपेक्षित होतं. तसचं अनिल बोंडे यांना उमेदवारी मिळाली यासाठी यांनाही पंकजा मुंडे यांनी शुभेच्या दिल्या आहेत.