शिवसेना-राष्ट्रवादीकडून ‘या’ १० नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. २३० जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. यात भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत. या विजयानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान मंत्रिपदाबाबत नवी दिल्लीतून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ मंत्री शपथ घेणार आहेत. या नावांवर लवकरच शिक्कमोर्तब होणार आहे. या दिल्लीमध्ये एकमत झाल्याचे समजत आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या नावांवर महायुतीचे प्रमुख तीनही नेते चर्चा करून लवकरच या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
‘या’ नेत्यांची लागू शकते मंत्रीपदी वर्णी
शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो.