ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“मुख्यमंत्रीपद गेल्याचं दुःख नाही असणारही नाही” म्हणाले…

नागपूर : (Devendra Fadnavis On Press Conference) गुरुवार दि. ३० जुन रोजी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दि. ५ जुलै रोजी प्रथमच नागपुरात आले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार आहेत. पण तरीही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटलं म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, असे देवेंद्र फडणवीस प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

दरम्यान ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढलो. जनतेनं युतीला बहुमत दिलं मात्र, शिवसेनेने जनतेचा अनादर केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्तास्थापन केली. महाराष्ट्रात चुकीचे सरकार स्थापन झाल्याने अस्वस्थ वाटत होते. मी मुख्ममंत्री झालो नाही याचं दुःख मला कधीच नव्हते आणि असणारही नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन समोर नेणारं सरकार महाराष्ट्रात आलं नाही याचं दुःख होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यामुळं मी योग्यवेळी योग्य गोष्टी करणार हे ठरवलं होतं. यासाठी आम्ही लक्ष ठेवून होतो. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळं आम्हाला ती संधी मिळाली. यांनी शिवसेनेतून वेगळ होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सहकार्य करण्याचे आम्ही ठरवले. तसेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे ठरवले, त्यामुळं आमच्याकडून शिंदे यांना ही संधी देण्यात आली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये