ताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूडचे ‘हे’ सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्हाला चक्रावून सोडतील, एकदा पाहाच

आत्तापर्यंत आपण बॉलिवूडचे कॉमेडी, थ्रिलर, अॅक्शन, हॉरर असे अनेक चित्रपट पाहिले आहेत. पण काही प्रेक्षक असेही असतात ज्यांना सस्पेन्स, थ्रिलर, ट्विस्ट आणणारे चित्रपट पाहायला आवडतात. हे चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात, त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन मोठ्या प्रमाणात होताना दिसतं. त्यामुळे सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षक नेहमी पसंती देताना दिसतात. तसंच असे चित्रपट ते आवर्जून पाहत असतात. तर आता आपण बॉलिवूडच्या काही अशा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत ज्याची कथा उत्कृष्ट दर्जाची असून ते सुपरहिट ठरले आहेत.

1. तलाश (Talaash) – ‘तलाश’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात आमिर खान, राणी मुखर्जी आणि करीना कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. तलाश हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे जो तुम्हाला चक्रावून सोडेल. या चित्रपटातील इन्स्पेक्टर सुरजन शेखावत हे रहस्य उलगडत असतात त्यांच्यासोबत तुम्हीही हा चित्रपट पाहाताना रहस्य उलगडण्याचा प्रयत्न कराल, असा हा चित्रपट आहे. तसंच यातील धक्कादायक ट्विस्ट पाहून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल, त्यामुळे एकदा तरी तलाश हा चित्रपट नक्की पाहा.

image 2 1

2. बदला (Badla) – ‘बदला’ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांनी उत्कृष्ट असा अभिनय केला आहे. या चित्रपटातील सनीचे नेमकं काय झालं? नैनानं तिच्या प्रियकराचा खून का केला? अशा अनेक गोष्टींचे रहस्य पाहील्यानंतर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. तसंच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारली असून त्यांनी तापसीची हटके पद्धतीनं फिरकी घेतल्याचं दिसलं आहे, त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.

image 2 2

3. कहाणी (Kahaani) – विद्या बालनचा ‘कहाणी’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट विलक्षण चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे आकर्षक कथेसाठी मोठ्या बजेटची गरज नसते. तसंच हा एक हादरवून सोडणारा चित्रपट आहे. कहाणी चित्रपटात विद्या बालननं विद्या बागची या पात्राची भुमिका साकारली होती. ती गर्भवती अवस्थेत तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेत असते. यावेळी येणारे ट्विस्ट तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडतील.

image 2 3

    Related Articles

    Leave a Reply

    Back to top button
    error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये