‘या’ कॉमेडी वेब सीरिज आहेत खूपच लोकप्रिय, पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
आत्तापर्यंत तुम्ही हॉरर, अॅक्शन, ड्रामा, लव्ह स्टोरी, सस्पेन्स थ्रीलर यावर आधारित चित्रपट, वेब सीरिज पाहिल्या असतील. अशा प्रकारचे वेब सीरिज, चित्रपट प्रेक्षकांना पाहायला आवडते. पण बहुतेक लोकांना कॉमेडी शो, चित्रपट, सीरिज पाहायला आवडतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडसं हसणंही गरजेचं आहे. त्यामुळे बहुतेक लोक कॉमेडी चित्रपट किंवा सीरिज पाहत असतात. तर तुम्हालाही कॉमेडीची क्रेझ असले तर तुम्ही खालील वेब सीरिज नक्की पाहा. त्या पाहून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.
1. पर्मनंट रूममेट्स (Permanent Roommates) – ‘पर्मनंट रूममेट्स’ ही एक कॉमेडी लोकप्रिय वेब सीरिज आहे. सोनी लिववरील या सीरिजमध्ये मैत्रीवर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. मिकेश आणि तान्या त्यांच्या मैत्रीला नव्या उंचीवर नेऊ की नाही या संभ्रमात असतात. ही सीरिज खूपच मजेशीर असून तुम्हालाही नक्कीच आवडेल.
2. हसमुख (Hasmukh) – नेटफ्लिक्सवरील ‘हसमुख’ ही वेबसीरिज सुपरहिट ठरली होती. या सीरिजमध्ये एक माणसाची स्टोरी दाखवण्यात आली आहे ज्याला स्टँड-अप कॉमेडियन बनायचं असतं. पण जेव्हा तो ज्येष्ठ कॉमेडियन बनतो तेव्हा त्याला सारखा त्रास सहन करावा लागत असतो. या सीरिजमध्ये मनोज पाहवा आणि वीर दास हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.
3. लाइफ सही है (Life Sahi hai) – ‘लाइफ सही है’ या कॉमेडी सीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. ही सीरिज चार अविवाहित मित्रांभोवती फिरते. या चार मित्रांची स्टोरी विनोदी स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही सीरिज सुपरहिट ठरली होती. तर तुम्हाला पोट धरून हसायचं असेल तर ‘लाइफ सही है’ ही सीरिज आवर्जून पहा.
4. फादर्स (Fathers) – ‘फादर्स’ या वेब सीरिजमद्ये जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यातील संघर्ष विनोदी पद्धतीने दाखवण्यात आला आहे. या सीरिजमध्ये तीन वडीलांची स्टोरी दाखवण्यात आली आहे ज्यांना नवीन पिढीसोबत समेट करण्यात त्रास सहन करावा लागत असतो. ही एक मजेशीर अशी सीरिज आहे. यामध्ये राकेश बेदी, मनोज जोशी आणि वीरेंद्र सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.