ताज्या बातम्यापुणे

घटस्थापनेच्या दिवशी पुण्यातील चतु:श्रृंगी देवीच्या दर्शनसाठी हजारो भाविकांची गर्दी

पुणे | शक्तीचं प्रतीक मानल्या जाणार्‍या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव (Navratri 2023). आजपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. घरोघरी आज घटस्थापना केली जातेय. तसेच पुण्यातील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात (Chatur Shringi Temple) सकाळपासून हजारो भाविकांनी एकच गर्दी केली आहे. तर त्या पार्श्वभूमीवर चतु:श्रृंगी देवीच्या मंदिराचा इतिहास विश्वस्त नंदकुमार अनगळ यांच्याकडून जाणून घेतला आहे.

ते यावेळी म्हणाले की, पेशव्याच्या काळात दुर्लबशेठ पीतांबरदास हे सावकार होते.ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे की,ते तेवढे श्रीमंत होते. ते नाशिकच्या वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे भक्त होते.प्रत्येक चैत्र आणि अश्विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात हे दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे. अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली. मात्र त्यांना वृद्धापकाळाने वणीला जाणं शक्य नव्हतं.

आपल्याला देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना फार दुख: झालं. त्यावेळी देवीने त्यांचं दुख: जाणलं आणि देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. डोंगरावर उत्खनन कर आणि त्या ठिकाणी तांदूळ स्वरूप मूर्ती सापडेल असे सांगितले. त्यावर दुर्लबशेठ पीतांबरदास डोंगरावर उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि १७६२ साली चैत्र पोर्णिमेच्या दिवशी चतु:श्रृंगी देवीची मूर्ती सापडली आहे. देवीच्या मूर्तीच्या वैशिष्टयाबाबत सांगायचे झाल्यास,तांदळा स्वरूपामध्ये देवीची मुखवट्यामध्ये मूर्ती बसलेली आहे.तर एका बाजूला मूर्ती झुकलेली आहे.सप्तश्रृंगी मातेसारखी मूर्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये