क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश
धक्कादायक! दिल्ली विमानतळावर; दिल्ली-पुणे विस्तारा विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी!
नवी दिल्ली : दिल्ली विमानतळ येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी अज्ञातांकडून मिळाली आहे.
यावेळी माहिती मिळताच विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विमानातील सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे.
दरम्यान, फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता. त्यावेळी एकच खळबळ उडाली. मात्र, कोणीही घाबरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. पुढील तपास दिल्ली पोलिसांसह इतर पथक करीत आहेत.