दाभोलकरांसारखी गत करू…; यशोमती ठाकूर यांना धमकी
मुंबई | Yashomati Thakur – माजी मंत्री, काँग्रेसच्या (Congress) आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून ही धमकी देण्यात आली आहे. असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना दिला आहे. या धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमदार यशोमती ठाकूर या देखील आक्रमकपणे या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला. हरामखोर बाई कोण आहे स्पष्ट करा, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दाभोळकर असाच ओरडत होता. एकदिवस जन्नतमध्ये पाठवला. धारकरी कोथळा बाहेर काढतात, हे लक्षात असू द्या, असं म्हणत ठाकूर यांना धमकावण्यात आलं आहे.
तुम्हाला काय करायचंय ते करा. मला मारायचं असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. पण माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल.
– यशोमती ठाकूर काँग्रेस नेत्या