ताज्या बातम्यापुणे

शहरात डेंग्यूचे तीन रुग्ण, डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू आजाराचे ७६ रुग्ण, चिकुनगुनिया आजाराचे ८ रुग्ण व झिका आजाराचे ५ रुग्ण आढळुन आले आहेत. या रुग्णांपैकी ३ रुग्ण गर्भवती महिला आहे. तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे इ. त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे वैद्यकीय विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या परिसरात चिकुनगुण्या व झिका या आजारांच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता पावसाळ्याच्या दिवसामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराच्या प्रतिबंधाकामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने “ डेंग्यु मुक्त पीसीएमसी मोहिमेची सुरुवात केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये