ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट

मालवण येथे शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेना-ठाकरे खडकवासला विधानसभा यांच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर राज्य शासन आणि संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात निषेधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला. एवढी वाईट घटना घडल्यावरही बालिश प्रतिक्रिया देणारे राज्यातील मंत्र्यांचा निषेध करत त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन पासलकर यांनी केली. येणाऱ्या काळात भ्रष्टाचारी सरकारला जनताच कडेलोट करेल, असा विश्वास जिल्हासंघटक बुवा खाटपे यांनी व्यक्त केला.

सरकारच्या कारभाराविरोधात शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले आणि संदीप मते यांनी दिला. यावेळी शहरसंघटक संतोष गोपाळ, माजी पंचायत समिती सदस्य पोपट चोरगे, नाना मरगळे, दीपक खिरीड, विनायक नलावडे, निवृत्ती वाव्हळ, प्रदीप दोडके, आकाश यादव, सागर जावळकर शिवसैनिक उपस्तिथ होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये