ताज्या बातम्यापुणे
पुण्यात आज राहुल गांधी यांची सभा! कॉँग्रेसचे दिग्गज नेते राहणार उपस्थित
पुणे | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेला राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
आरटीओ ऑफिस शेजारी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) मैदानावर आज शुक्रवारी (३ मे) सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना शहजादा म्हणत यांच्यावर मोठी टीका केली होती. या टीकेला राहुल गांधी काय उत्तर देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.