अर्थताज्या बातम्या

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची झळाळी वाढली, सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या दर

Gold Rate : आपल्याकडे सोनं खरेदी हा फक्त दागिन्यांपुरताच मर्यादित विषय आता राहिलेला नाहीतर ती एक गुंतवणूक मानली जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी केली जाणारी ही गुंतवणूक वर्षभर भराभराट करणारी ठरेल. या विचाराने लोकं थोडं का होईना पण सोनं खरेदी करतात. गुढीपाडवा हे फक्त निमित्त आहे सोनखरेदीसाठी. गुढीपाडवा उद्यावर येऊन ठेपलेला असताना सोनं मात्र भाव खाताना दिसतंय. दोन-तीन दिवसांपासून सोनंच्या किंमतीत तेजी आल्याचं दिसतंय. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज सोन्याच्या दरात सातत्याने उसळी सुरू आहे.

image 3 6

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन 21 मार्च 2023 रोजी सकाळी सोने महाग झाले आणि चांदी स्वस्त झाली. सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे.

image 3 7

चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,487 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 68,409 रुपये आहे.

image 3 8

सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 59479 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59487 रुपयांवर आला आहे. तसेच शुद्धतेच्या आधारावर सोने किरकोळ महागले असून चांदी स्वस्त झाली आहे.

image 3 9

आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५९२४९ रुपये झाली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 54490 रुपये झालेय. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 44615 वर आलाय. तर 585 शुद्धतेचे सोने महाग होऊन आज 34,800 रुपयांवर पोहोचलेय. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 68409 रुपये झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये