पुणे

मोहरम निमीत्त पुण्यात आज या भागात वाहतूक बदल

मोहरम सणानिमित्त आज (दि.१७) ताबूत, पंजे, छबिले यांचे विसर्जन करण्याकरीत मिरवणूका निघणार आहेत. त्यामुळे खडकी, लष्कर भाग, पाटील इस्टेट, इमामवाडा या भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपाय़ुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना मात्र या बंदी आदेशा दरम्यान मुभा राहणार आहे.

१. मुख्य मिरवणूक (दुपारी ३ वा.) – मार्ग: श्रीनाथ टॉकिज येथून निघुन दत्त मंदीर बेलबाग चौक बुधवार चौक जिजामाता चौक डावीकडे बळुन शनिवारवाडा फुटक्या बुरुजास बळसा घालुन शनिवारवाडा समोरील गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळुन डेगळे पुल- गाडीतळ चौक डावीकडे बळुन रेत्ये पुलाखालून आरटीओ चौक ते संगम ब्रीज विसर्जनाचे ठिकाणी संगगधाट विसर्जन ठिकाण.

२. लष्कर मिरवणूक (दुपारी १२ वा.) – मार्ग: ६८४ ताबुत पंजे ताबुत स्ट्रीट येथे एकत्र जमुन, बाटलीवाला बगीचा सरबतवाला चौक बाबाजान दर्गा भोपळे चौक गावकसाब मशिद डावीकडे वळून एम.जी. रोडने कोहीनूर चौक भगवान महावीर चौक नाझ हॉटेल चौक डावीकडे वळून बुटी स्ट्रीटने बाटलीवाला बगीचा चौक या ठिकाणी दुपारी 2 वाजता. चे सुमारास येऊन धार्मिक कार्यक्रमासाठी थांबतात. त्यानंतर पुढे नेहरू मेमोरीयल हॉल रहीम पेट्रोल पंप जुना समर्थ पोलीस स्टेशन मार्गे डावीकडे वळून पॉवर हाऊस बौक के. ई.एम. हॉस्पीटल समोरुन अपोलो टॉकिज चौक दारुवाला पुल फडके हौद चौक डावीकडे चळुन मोती चौक सोन्या मारुती चौक उजवीकडे वळुन विजय मारुती चौक ते बेलबाग चौक मार्गाने श्रीनाथ सिनेमा येथे येऊन मुख्य मिरवणुकीत सामील होते.

३. खडकी भागातून निघणारी मिरवणूक (दुपारी ६.४५ वा.) – मार्ग वाबुत मिरवणुक बोपोडी चौक येथे येवुन मुंबई पुणे रोडने दापोडी नदी किनारी विसर्जन होणार आहे.

४. पाटील इस्टेट गल्ली नं १० मिरवणूक (दुपारी २ वा.) – मार्ग रेशीम विभाग व दुध डेअरी जवळील ताबुत मिरवणुकीने पाटील इस्टेट या ठिकाणी येवुन पुन्हा परत जागेवर येणार आहेत. तसेच पाटील इस्टेट गल्ली ने १० येथील तायुत मिरवणुक संगम ब्रिज या ठिकाणी येवुन विसर्जित होणार आहे.

५. इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक (सकाळी १०.३० वा.) – मार्ग इमामवाडा लष्कर ते आगाखान कंपाऊंड ते परत इमामबाडा मार्ग रहिम पेट्रोलपंप, नेहरु मेगोरीयल चौक, डावीकडे वळून पोलीस आयुक्त कार्यालय समोरुन जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधु वासवानी चौक,13 कॅनॉट रोड, आगाखान कंपाऊंड येथे धार्मिक कार्यक्रम होऊन परत उलट मार्गाने इमामवाडा येथे विसर्जन,

वरील नमूद मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार अल्पकालावधी करीता बंद अथवा वळविण्यात येणार आहे तसेच मिरवणूक पुढे सरकताच पाठीमागील वाहतूक पुर्ववत करण्यात येईल. तरी वाहन चालकांनी वरील नमूद मार्गावर येण्याचे टाळावे तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहान पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये