ताज्या बातम्यामनोरंजन

Tiger 3: “जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं”, ‘टायगर 3’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | Tiger 3 Trailer : बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानच्या (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. सध्या ‘टायगर 3’ चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसंच या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

‘टायगर 3’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान दमदार लूकमध्ये दिसत आहे. तर इमरान हाश्मी देखील एकदम किलर लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात एक महिलेच्या आवाजाने झालेली दिसत आहे. ज्यामध्ये ती देशाची शांतता आणि देशाच्या शत्रूंमध्ये किती अंतर आहे हे सांगत आहे. त्यानंतर सलमानची ग्रॅण्ड एन्ट्री होताना दिसते.

या ट्रेलरमध्ये सलमान खान बाइक स्टंट आणि अॅक्शन सीन करताना दिसत आहे. तर कतरिना कैफ डॅशिंग लूकमध्ये दिसत असून ती तिच्या उत्कृष्ट अभिनयानं चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. या चित्रपटात सलमान अविनाश राठोडच्या भूमिकेत दिसत आहे. तसंच “जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं” हा सलमानचा डॉयलॉग चांगलाच फेमस होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये